Raj Thackeray आज पुणे दौऱ्यावर, माध्यमांशी साधणार संवाद  
मुंबई/पुणे

Raj Thackeray आज पुणे दौऱ्यावर, माध्यमांशी साधणार संवाद

महाविकास आघाडीसह, लॉकडाऊन, निर्बंध आणि लोकल बाबतही मांडणार भूमिका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. गेल्या महिनाभरातील राज ठाकरे यांचा आजचा पाचवा पुणे दौरा (Pune Visit) आहे. आजच्या दौऱ्यात ते शाखाध्यक्षांच्या निवडीच्या घोषणेसह ते पदाधिकाऱ्यांशी अनेक विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सायंकाळी ४ वाजता ते आज माध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे देखील पहा-

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे अधिकच सक्रिय झाले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे अनेक महत्त्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मांडणार थेट भूमिका मांडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यासोबत केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला दिलेली भेट आणि शुद्धीकरण या विषयावर राज काय भुमिका मांडतात, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच लॉकडाऊन, निर्बंध आणि लोकल राज ठाकरे काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसे सर्व जागा लढवणार असल्याचे मनसे नेते सांगत आहे. यंदाच्या निवडूकीत मनसे 45 जागा निवडून येणार असल्याचा दावाही मनसे नेत्यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात १९, २० आणि २१ जुलै रोजी पुणे दौऱ्यावर होते. त्यानंतर २७ जुलै आणि त्यानतंर १३ऑगस्ट रोजी देखील त्यांनी पुणे दौरा केला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT