Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Maharashtra Political News : मुंबई महापालिकेसाठी मनसेनं ठाकरेंना जागावाटपाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आलीय.. या प्रस्तावानुसार मनसे शिंदेसेनेपुढं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे... मात्र मनसेनं ठाकरेसेनेला किती जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे..पाहूयात....

Snehil Shivaji

विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मुलाच्या दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंच्या मैदानात शिंदेच्या उमेदवारांना पाणी पाजण्यासाठी तयार झालेत. आता मुंबई महापालिकेच्या रणांगणांत राज ठाकरेंचा थेट सामना हा शिंदे गटाशी होणार असल्याची शक्यता आहे. शिंदेंना घेरण्याची ठाकरे बंधूंनी रणनिती आखल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. शिदेंना मुंबईत रोखण्याचा ठाकरेंचा नेमका प्लॅन काय आहे पाहूया

मुंबईत शिवसेनेकडे मनसेची 75 जागांची मागणी

शिंदेसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या वार्डावर राज ठाकरेंची नजर

भाजप विरोधात शिवसेना तर शिंदेविरोधात मनसे लढत

शिंदेंना मुंबईत घेरण्याचा ठाकरे बंधुचा प्लॅन

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आमदार आणि खासदारच नाही तर मोठ्या प्रमाणात शिवसेनेतील नगरसेवकही शिंदेच्या शिवसेनेत सामिल झाले. गेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये शिंदे गटावर ठाकरेंनी मात करुन मुंबईत चांगली कामगिरी करुनही ठाकरेंनी मनसेला जागा सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर या मागे ठाकरेंनी भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेविरोधात मनसे अशी रणनिती निवडणुकांसाठी ठरवल्याच दिसतंय. आता या रणनितीनुसार धनुष्यबाण इंजिनला अडवतं की मशालच्या साथीनं इंजिन वेगात पळत हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : अहिल्यानगर हादरलं! बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

महायुतीत फोडाफोडी सुरूच! एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांना धक्का, बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Zodiac Signs: चंद्र कन्या राशीत; काम, पैसा आणि नात्यांसाठी आजचा दिवस किती शुभ?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक भाकीत

SCROLL FOR NEXT