Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray Speech : शिवसेना, धनुष्यबाण माझा की तुझा वाद पाहून वेदना झाल्या, राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

Raj Thackeray On Shivsena Symbol Crisis: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray Speech in MNS Melava : शिवसेना फुटीवर आज राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन तुझं की माझं सुरु असताना प्रचंड वेदना झाल्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

अनेक जण म्हणाले मनसे संपलेला पक्ष आहे. जे बोलले त्यांची अवस्था काय आहे, तुम्हाला माहिती आहे. मात्र सध्याच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय. हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होतं. (Political News)

मात्र ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण तुझं की माझं हे चालू होतं त्यावेळी प्रचंड वेदना होत होत्या. इतकी वर्ष तो पक्ष पाहत आलो, जगलो. राजकारण लहानपणापासून पाहत आलो, अनुभवत आलो. असंख्य लोकांनी कष्टाने उभी केलेली संघटनेत सुरु असलेल्या घडामोडींमुळे वाईट वाटलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

एकदाच सर्वांनी ठरवा आणि आताच निवडणुका लावा

राज्याच्या राजकारणात सध्या हे गेले, ते आले असं सगलं सुरु आहे. आजपर्यंत आपण अशा प्रकारचं राजकारण पाहिलं नव्हत. नवे उद्योग राज्यात येत नाहीत, बेरोजगारी वाढत चालली आहे. सर्वसामान्य सरकारकडे पाहत आहे आणि सरकार कोर्टाकडे बघत आहे, आमचं काय होणार?, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

एवढं करण्यापेक्षा एकदाच सर्वांनी ठरवा आणि आताच निवडणुका लावूया. राजकारणात जो काही सध्या चिखल झालाय, तोच लोक तोंडात घालतीय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Open Sleeping Problem: रात्री तोंड उघडे ठेवून झोपणं धोक्याचे? वेळीच व्हा सावध, नाहीतर होऊ शकतात हे ५ गंभीर आजार

Tamilnadu Tourism: मे महिना कायम राहील आठवणीत, तमिळनाडूतल्या या स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना नक्कीच द्या भेट

Maharashtra News Live Update: धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे झाली होती दोन गटात हाणामारी

Face Care: पिंपल्स कमी करुन नॅचरल सॉफ्ट चेहरा हवा असेल तर घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक नक्की ट्राय करा

माजी मंत्र्याचे निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; औरंगाबादमधून लढवली होती निवडणूक

SCROLL FOR NEXT