Raj Thackeray criticizes CM Devendra Fadnavis over remarks on the Missing Link tunnel collapse controversy in Maharashtra. saam tv
मुंबई/पुणे

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Raj Thackeray vs Devendra Fadnavis: मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर टीका करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला... महाराष्ट्राचा अपमान खपवून घेणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं...मात्र आता फडणवीसांच्या याच विधानाला राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय...राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मोठा गाजावाजा करून २ महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेला आणि जागातला सर्वात रूंद बोगदा असलेल्या मिसिंग लिंकमध्ये पहिल्याच पावसात दरड कोसळल्यानं सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलंय.त्यात विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवर बोलताना महाराष्ट्राची बदनामी कराल तर सोडणार नाही असा सज्जड दमच भरला. मात्र यावर तीव्र आक्षेप घेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय.

एवढंच नव्हे तर मिसिंग लिंकच्या दुर्घटनेला नैसर्गिक घटना म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचाही राज ठाकरेंनी समाचार घेतलाय.

दरम्यान ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधल्यानं भाजप नेत्यांनीही पलटवार केलाय.

पावसाच्या सुरुवातीलाच 7 हजार कोटींच्या मिसिंग लिंक प्रकल्पाला गळती लागल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळालयं...मात्र अधिवेशनात विरोधकांमध्ये सरकारला घेरण्याची कोणतीही रणनीती दिसून आली नाही. उलट विधानभवनाच्या बाहेर राज ठाकरेंनी सर्वाधिक आक्रमक भूमिका घेत सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. त्यामुळे मिसिंग लिंकच्या मुद्यावरून मनसे विरूद्ध भाजप असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

डायबेटीजच्या रुग्णांना मोठा दिलासा, आठवड्यातून फक्त एकदाच घ्या इन्सूलिन

SCROLL FOR NEXT