Raj Thackeray on Gokul Dairy election controversy Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray : गोकुळवरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले, पराभव मान्य करायला हवा, पण...

Raj Thackeray on Gokul Dairy Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जनतेने दिलेला कौल स्वीकारून पराभव मान्य करायला हवा, असे म्हणत त्यांनी भाजपच्या 'लोकशाही वाचवा' मोर्चावरही प्रश्न उपस्थित केले.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray on Gokul Dairy election controversy : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कारवाईवर आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'सकाळ पुणे लिट फेस्ट'मधील मुलाखतीत परखड भाष्य केले. विरोधी पक्षाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या मोर्च्यांवर आणि कोल्हापूरच्या 'गोकुळ दूध संघ' निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी लोकशाहीच्या सध्याच्या स्थितीवर जोरदार ताशेरे ओढले.

"सरकारच विरोधी पक्षावर मोर्चा काढतंय!"

राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आत्ता भारतीय जनता पक्षाने 'लोकशाही वाचवा' म्हणून मोर्चा काढला. मला तर ते समजलंच नाही; जगातलं हे एकमेव सरकार असेल, जे विरोधी पक्षावर मोर्चा काढतं! जनरली जगामध्ये विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात मोर्चा काढतो, पण इथे उलटीच गंगा वाहताना दिसते."

गोकुळ निवडणुकीचा दाखला देत राज ठाकरेंचा टोला

राज ठाकरेंनी यावरून कोल्हापूरच्या 'गोकुळ दूध संघ' निवडणुकीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "कोल्हापूरच्या गोकुळ दूध डेरीत दुसरं पॅनल जिंकून आलं. निवडणूक हरल्यानंतर पराभव मान्य करावा, त्याऐवजी तिथे चार कोटरी सरकारी सदस्य लावून ती डेरी पुन्हा आपल्या ताब्यात कशी येईल, याचे प्रयत्न झाले. मग अशा वेळी 'लोकशाही वाचवा' हा नारा कुठून आला?"

व्यंगचित्रकार आणि पत्रकारांच्या भूमिकेवर स्पष्ट मत

जनतेने मतदान करूनही निकाल मान्य नसतील आणि अशा कारभारावर जेव्हा एखादा व्यंगचित्रकार, पत्रकार किंवा संपादक बोट ठेवून भाष्य करतो, तेव्हा त्याला 'स्वैराचार' म्हटले जाते, यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "या सगळ्या प्रकारावर जेव्हा कोणी बोट ठेवतो, तेव्हा राज्यकर्त्यांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, पण घडलेल्या घटनेवर भाष्य करणं म्हणजे समोरच्याला आरसा दाखवणं असतं. मात्र, ती गोष्ट समजून घेण्याची कॅपॅसिटीच नसेल, तर मग विषयच संपला."

निलेश खरे (संपादक, 'सकाळ' समूह):

सर, ज्यावेळेला राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारला जातो, त्यावेळेला त्यांचं म्हण असतं की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण स्वैराचार नाही." जे काही सुरू आहे, ते स्वैराचाराच्या दिशेने चालले आहे, असा युक्तिवाद सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. या युक्तिवादाकडे तुम्ही कसे बघता?

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष :

नाही, आता प्रश्न असा आहे... मी तुम्हाला एक उदाहरण देतो, जसे भारतीय जनता पक्षाने नुकताच 'लोकशाही वाचवा' म्हणून एक मोर्चा काढला होता. मला ते समजलंच नाही; जगामध्ये हे एकमेव पहिलं असं सरकार असेल, जी सत्तेत असताना विरोधी पक्षावर मोर्चा काढते! जनरली जगामध्ये विरोधी पक्ष हा सरकारच्या विरोधात मोर्चा काढतो, पण इथे सरकारच विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढत आहे.

याचे एक उदाहरण द्यायचे तर, कोल्हापूरमधील 'गोकुळ' दूध संघाची निवडणूक आपण पाहिलात. तिथे विरोधी पॅनल जिंकून आले. अशा वेळी लोकांच्या जनादेशानुसार पराभव मान्य करायला हवा, पण तो स्वीकारण्याऐवजी तिथे चार कोटी किंवा सरकारी यंत्रणा लावून ती संस्था पुन्हा आपल्या ताब्यात कशी येईल, याचे प्रयत्न झाले. मग अशा वेळी 'लोकशाही वाचवा' हा नारा कुठून आला?

जर जनतेने मतदान करून कौल दिला, पण तो तुम्हाला मान्य नसेल, तर कसली लोकशाही वाचवताय? अशा प्रकारच्या घटनांवर जेव्हा एखादा व्यंगचित्रकार, पत्रकार किंवा संपादक बोट ठेवतो, तेव्हा राज्यकर्त्यांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. या सगळ्या राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो; पण घडलेल्या घटनेवर एखादं परखड भाष्य करणं म्हणजे समोरच्याला आरसा दाखवणं असतं. ते समजून घेण्याची ताकद किंवा कॅपॅसिटीच जर नेत्यांमध्ये नसेल, तर मग विषयच संपला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : केसांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केस धुताना महिलांनी या 7 चुका टाळाव्यात

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत? वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत योग्य नियम

Raj Thackeray : हिटलरही व्यंगचित्राला घाबरला, आजचे सत्ताधारी.... पाहा राज ठाकरे काय म्हणाले?

Rinku Rajguru: अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या लेकीच्या संघर्ष; रिंकू राजगुरु लवकरच पहिल्यांदाच दिसणार अॅक्शन अवतारात

SCROLL FOR NEXT