Vasant More- Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात, वसंत मोरे गैरहजर; साईनाथ बाबर म्हणाले...

राज ठाकरे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणूकांसाठी राज ठाकरे मोर्चे बांधणी करत आहेत.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: राज ठाकरे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणूकांसाठी राज ठाकरे मोर्चे बांधणी करत आहेत. आज राज ठाकरे पुण्यातून निघून वढू इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून औरंगाबादला रवाना होणार आहेत. परंतु पुण्यात पुन्हा उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन चर्चेत आलेले पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) कालपासून कुठेही दिसत नाहीत.

खरंतर या मुद्द्यावरुन स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होते. मात्र अद्याप पक्षात असूनही ते या सर्व गोष्टींपासून नामानिराळे आहेत. मनसेच्या इतक्या मोठ्या कार्यक्रमात वसंत मोरेंची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबात माहिती देताना शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) म्हणाले ते थेट औरंगाबादच्या सभेला उपस्थीत राहणार आहेत. आता पुण्यात ते का उपस्थीत नाहीत हे माहित नसल्याचं साईनाथ बाबर म्हणाले.

दरम्यान राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्याबाबत कडक भूमिका घेतली आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले. पुण्यातील मनसेते नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेला माझं समर्थन नाही असे वसंत मोरे म्हणाले. त्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवले. परंतु आपण पक्षातच राहणार असल्याचे वसंत मोरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेमध्येही राज ठाकरे आपल्या भोंग्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि राज्य सरकारला ३ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला. मशिवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT