Raj Thackeray: आजपासून परत पुणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका अश्विनी जाधव- केदारी
मुंबई/पुणे

Raj Thackeray: आजपासून परत पुणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका

जुलै महिन्यापासून राज ठाकरे यांचे ३ पुणे दौरे झाले आहेत. आज परत एकदा चौथ्यांदा पुण्याला भेट देण्याकरिता आले

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : जुलै महिन्यापासून राज ठाकरे यांचे ३ पुणे दौरे झाले आहेत. आज परत एकदा चौथ्यांदा पुण्याला भेट देण्याकरिता आले आहेत. २ दिवसीय दौऱ्यामध्ये राज ठाकरे पक्ष : पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत .राज ठाकरे हे ६ ऑगस्टला देखील ते पुणे दौऱ्यावर आले होते.

हे देखील पहा-

यानंतर आज परत एकदा दौऱ्याकरिता पुण्यात दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० जुलै दिवशी पुण्यात दाखल झाले होते. यानंतर आज परत एकदा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली आहे. त्याअगोदर आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९, २० आणि २१ जुलै अशा ३ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरलेला होता. ८ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला राज ठाकरे परत होते. त्यानंतर आता राज ठाकरे आज परत एकदा पुणे दौऱ्यावर आले आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत यावेळेस मनसे सर्व जागा लढवणार आहे.

त्यात ९० जागांवर मनसेने आपले लक्ष केंद्रीत केल्याचे सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत. दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असे मनसे नेते सांगत आहेत. मात्र, शहरात पक्ष संघटनेचा प्रभाव देखील कमी झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

SCROLL FOR NEXT