Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : मनसेच्या बैठकीत कोणत्या २२ जागांवर चर्चा झाली? संभाव्य उमेदवारांची नावंही चर्चेत

Maharashtra Political News : मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते.

प्रविण वाकचौरे

आवेश तांदळे

Mumbai News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं समोर आलं आहे. मनसेची सोमवारी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेण्यात आले. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. (Political News)

मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याच्या तयारीत मनसे आहे. (Latest Marathi News)

मनसे कोणत्या 22 जागा लढवण्याच्या तयारीत?

  • मुंबई - ६

  • ठाणे- ३

  • कोकण -३

  • पुणे - ४

  • नाशिक - २

  • कोल्हापूर

  • सोलापूर

  • अमरावती

  • चंद्रपूर

कुणाची नावं चर्चेत?

राज ठाकरे यांनी बैठकी नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करत जोमाने तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कोण असतील याबाबतची चर्चा पुढच्या बैठकीत होणार आहे.

मात्र दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांचे नाव चर्चेत आहे. मुंबईतीच्या सर्व जागी मनसेकडून उमेदवार दिले जाऊ शकतात. कल्याणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांच नाव चर्चेत आहे. बारामती किंवा पुण्यातून वसंत मोरे तर सोलापूर मधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT