MNS Manisha Majgaonkar  Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election : मुंबईतून पहिली बंडखोरी! मनसे नेत्या अनिशा माजगावकर अपक्ष निवडणूक लढवणार

MNS Manisha Majgaonkar News : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी पक्षातील जागा वाटपाच्या तणावानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Alisha Khedekar

राज्यात महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता पक्षांतर्गत जागा वाटप सुरु आहे. काही पक्षांच्या जागा वाटप झाल्या आहेत. त्यामुळे पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. अशातच मनसेच्या प्रवक्त्या आणि माझी नगरसेविका अनिशा माजगावकर मनसेमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रभाग क्रमांक ११४ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजीव पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. यानंतर वाटाघाटी फीसकटल्यामुळे अखेर अनिशा माजगावकर या अपक्ष लढणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप पूर्ण झाले असले तरी यादी जाहीर झालेली नाही. जो पर्यंत सर्व उमेदवार अर्ज दाखल करत नाही तो पर्यंत कोणतीही यादी मनसेकडून जाहीर केली जाणार नसून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत गुप्तता पाळण्याची मनसेची रणनीती आहे. युतीच्या घोषणेवेळी राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्याचा भान ठेवून मनसे नेत्यांकडून सावध भूमिका घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra News Live Update: बिबट्याच्या अवयवांची तस्करी, पुण्यातील संगमवाडीत वनविभागाचा सापळा

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT