Raj Thackeray saam tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याचीच वाट पाहतोय! राज ठाकरेंचे थेट विधान; नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray Press Conference : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची वाट पाहतोय, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमधील वाहतूक सेनेच्या मेळाव्यात केले.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray Live Update : राज्यातील ढासळती टाऊन प्लॅनिंग, वाहतुकीचा रोजचा बोजवारा आणि प्रशासनाचा अनागोंदी कारभारावर राज ठाकरेंनी बोट ठेवले. हे सर्व सुधारण्यासाठी महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देतोय, याचीच मी वाट पाहतोय, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पनवेल येथे आयोजित मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वाहतूक कोंडी, पोलिसांवरील ताण आणि नियोजनशून्य विकासकामांवरून सरकार आणि प्रशासनाचे वाभाडे काढले. हे काही 'रॉकेट सायन्स' नसून केवळ 'इच्छाशक्तीचा' प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आज शहरांची आणि वाहतुकीची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. येत्या काळात ती आणखी अक्राळविक्राळ रूप धारण करेल. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज असून महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतो, याची मी वाट पाहत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

इ-चलन आणि ट्रॅफिक पोलिसांची परिस्थिती

इ-चलन (E-Challan) सिस्टीमला कोणाचा विरोध नाही, पण ते ज्या पद्धतीने कॅमेऱ्यांवरून लावले जातात ते तपासले पाहिजे. माणसांचे काम कमी व्हावे म्हणून तंत्रज्ञान आले. सिग्नल आल्यावर पोलिसांचे काम कमी व्हायला हवे होते, पण आपल्याकडे सिग्नलही असतात आणि पोलीसही उभं राहावे लागतात. नागरिक शिस्त पाळत नाहीत आणि सर्व बोजा पोलिसांवर पडतो, असे राज ठाकरे म्हणाले.

वाहतुकीचे नियम आणि वैयक्तिक किस्सा

दुचाकीस्वारांना तर वाटते की सिग्नल आपल्यासाठी बनलेलाच नाही. आधी दुपारी १ वाजता गाड्या थांबायच्या, आता थांबत नाहीत. मला पायलट गाडीची सुरक्षा आहे, पण मी त्यांना सायरनचा आवाज न करायला सांगतो. कारण तो आवाज ऐकून मलाच वाटते की पोलीस मलाच पकडून नेणार आहेत. मी माझ्या चालकाला सुरक्षेचा ताफा असूनही सिग्नल न तोडण्याची सक्त ताकीद दिली आहे, कारण मला पाहून इतर लोकांनी नियम तोडू नयेत, असे राज ठाकरेंनी सांगितले.

टाऊन प्लॅनिंगचा पूर्ण बोजवारा

एखाद्या शहराच्या क्षेत्रफळाच्या किमान १५ टक्के रस्ते असावेत. पण पुण्यात अवघे ७ टक्के रस्ते उरले आहेत. वाहने वाढतात, टॉवर उभे राहत आहेत, पण रस्ते कुठे आहेत? मंत्री येतात आणि त्यांच्या दृष्टीने शहर पाहतात, त्यांना वाटतं सगळं छान सुरू आहे. पण सुखाने रस्त्यावरून चालताही येत नाही. ७.८ टक्के जीडीपी झाला सांगून काय चाटायचे का? जमिनी बळकावून, तलाव बुजवून आणि जंगले तोडून केवळ टँकरचे पाणी पुरवले जात आहे, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

वाहतूकदारांना शिस्तीचा सल्ला:

हायवेवरून जाताना लॉरी, टेम्पो आणि ट्रेलर नेहमी उजव्या लेनमधून जातात, जे चुकीचे आहे. वाहतूकदारांचे प्रश्न मी नक्कीच वरपर्यंत पोहोचवेन आणि संजय नाईक व आरिफ यांची मंडळी त्यावर बोलेल. परंतु वाहतूकदारांनी आणि ट्रक चालकांनी स्वतःलाही शिस्त लावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Bonus : पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या पगाराइतका बोनस; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

Tinnitus : कानात सतत येतोय शिट्टीसारखा आवाज? दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update: भाजपने आधी स्वतःचे संस्कार तपासावेत; खरगे यांच्या विरोधातील आंदोलनावरून काँग्रेसचा सवाल

Kidney Stone: दुखणं थांबलं म्हणजे स्टोन पडला असं वाटतंय? 'ही' चूक महागात पडू शकते

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई; वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT