Raj Thackeray News Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News : शरद पवार-अजित पवार गुप्त भेटीत दडलंय काय? राज ठाकरेंचा मोठा दावा

Raj Thackeray on Sharad Pawar Ajit Pawar Meeting : राज ठाकरे यांनी म्हटलं की, हे सगळं त्यांचं प्लानिंग आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. एक गट भाजपसोबत तर दुसरा महाविकास आघाडीसोबत आहे. मात्र पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट सध्या चर्चेत आहे.

शरद पवार यांनी या भेटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तरीही राजकीय वर्तुळात यावरुन संभ्रम कायम आहे. राज ठाकरे यांनीही या भेटीवर आपलं मत मांडल आहे.

राज ठाकरे यांनी म्हटलं की, हे सगळं त्यांचं प्लानिंग आहे. एक टीम त्यांनी आधी पाठवली आहे. त्यानंतर दुसरी टीम जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. हे आताच नाही, २०१४ पासूनच मिळालेले आहेत. (Political News)

तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार जिथे भेटले ती जागाही कमाल आहे. याचाही विचार करायला हवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुका कधी?

महापालिका निवडणुकांवर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, राजकीय परस्थिती पाहता महापालिका निवडणुका लागतील असं वाटत नाही. महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं होईल वाटत नाही. त्यामुळे आधी लोकसभा निवडणुकाच होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: माणुसकी कुठे मेली, ट्रेनमध्ये कुत्र्याला बांधलं अन् मालक फरार झाला, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Vande Bharat Express : पावसाचा फटका वंदे भारत एक्सप्रेसलाही, सोलापूर-मुंबई वंदे भारत रद्द, वाचा सविस्तर

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Rekha Gupta : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारणारा आरोपी कोण? गुजरातसोबत आहे कनेक्शन

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT