Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

तयार राहा! राज ठाकरेंनी पुण्यातून देशभरातील हिंदूंना केले आवाहन म्हणाले...

राज ठाकरे आपल्या भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरती ठाम आहेत.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये होते. काल त्यांनी हनुमान जयंतीची महाआरती पुण्यामध्ये केली. आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. आज देशभरातल्या सर्वांना सांगणे आहे की भोंग्यांचा विषय हा धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आपल्या भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांनी देशातील हिंदूंना तयार राहण्याचे आवाहन केले आहे. ३ तारखेपर्यंत रमजान असल्याने आम्ही काही करणार नाही. त्यानंतर आम्ही ज्या मशिदीवरती भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर आम्ही आमच्या आरत्या लावणार असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी पुण्यामध्ये दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. १ तारखेला म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. आणि ५ तारखेला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार अशा दोन घोषणा राज ठाकरेंनी केल्या आहेत. हनुमान चालीसा लावणाऱ्या काही मनसे कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ''सर्व मशिदींवरील लाऊडस्पिकर अनधिकृत आहेत तर आमच्या मुलांचे काम कसे अनधिकृत''. आपण सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळत नाही आहोत. देशापेक्षा धर्म मोठा नाही होऊ शकत हे आपण समजणार आहोत का नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT