Raj- Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj- Uddhav Thackeray: मोठी बातमी! हिंदी भाषा सक्तीविरोधात राज-उद्धव ठाकरे एकत्र, एकच मोर्चा निघणार; संजय राऊतांची घोषणा

Raj Thackeray and Uddhav Thackeray: हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार आहेत. ५ जुलै रोजी मुंबई हिंदी सक्तीविरोधात दोन्ही नेत्यांचा एकत्र मोर्चा निघणार आहे.

Priya More

हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंदी सक्तीला विरोध करत दोन्ही पक्षांनी आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली होती. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले असून ते एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली होती पण याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.

पण आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे बंधूंचा एकच मोर्चा निघेल असं सांगितले आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ जुलैला ठाकरे बंधू मोर्चाद्वारे महाराष्ट्र दणाणून टाकणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला. या फोटोवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!' संजय राऊत यांनी ही पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील टॅग केले आहे.

गुरूवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत मनसेने हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट ७ जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली होती.

आता त्याला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत एकत्र मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील नुकताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे सांगितले. या मोर्चाद्वारे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे त्यांची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Original Alphonso Mango: देवगड, रत्नागिरी आणि कर्नाटकचा ओरिजनल हापूस आंबा कसा ओळखायचा?

अमरावती पुन्हा हादरली; २२ वर्षीय तरुणाचा ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार

Phone Hacking Signs: स्मार्टफोनद्वारे कुणी तुमच्यावर नजर तर ठेवत नाही ना? या स्टेप फॉलो करून आताच करा चेक

Viral Video: रील बनवण्याच्या नादात दुचाकी थेट ट्रकखाली घुसली, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT