Schools Closed in MUmbai  Saam TV
मुंबई/पुणे

School closed in mumbai : मुंबईतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, पावसाच्या 'रेड अलर्ट'मुळे शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Mumbai Rain News : मुंबईला आज रात्री ८ वाजल्यापासून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Mumbai News : मुंबई कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक सखल भागांमध्ये यामुळे पाणी साचलं आहे. मुंबई पावसाची स्थिती उद्याही अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईला बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या  (Heavy Rain)  इशाऱ्यानंतर मुंबईतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली आहे. मुंबईत आज महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई आणि मुंबई उपनगरातील खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest News)

मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत गेल्या ६ तासांत ( संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत) अत्यंत तीव्र पावसाची नोंद आहे. दुपारपासून ७०-१०० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. पुढील ३-४ तास पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT