IMD Predict Mumbai Heavy Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Rain Alert in Maharashtra : पुणे आणि पालघरला उद्या रेड अलर्ट; तर ८ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

प्रविण वाकचौरे

Mumbai News : मागील ३-४ दिवसांपासून राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती आहे. आज राज्यातील ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार पावसाची अनेक भागात जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरु आहे.

उद्या राज्यातील पाऊस कसा असेल याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. उद्या पालघर आणि पुणे जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई-ठाण्यासह एकूण ८ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra News)

रेड अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि पालघरला रेड अलर्ट देण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस (rain) बरसत आहे. उद्याही दोन्ही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघरमधील शाळांनाही दोन दिवसांपासून सुट्टी देण्यात आली आहे.

8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

तर एकूण आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT