Railway Megablock 
मुंबई/पुणे

Railway Megablock: पश्चिम रेल्वे मार्गावर ३५ तासांचा मेगाब्लॉक, तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द

Railway Megablock:मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पश्चिम रेल्वे लाइनवर ३५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वची बातमी आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पश्चिम रेल्वे लाइनवर ३५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. . शनिवार दिनांक २६ एप्रिल दुपारी १ वाजल्यापासून सोमवार २८ एप्रिल मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान पूल क्रमांक ६१ वर गर्डरिंगच्या काम केलं जाणार आहे. तसेच कारशेड लाइनवरदेखील काम करण्यात येणार आहे. यामुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात. काही गाड्या उपनगरीय रेल्वेच्या जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल सेवेवरही परिणाम होईल.

ब्लॉकदरम्यान पाचव्या मार्गावर धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. प्रवाशांनो २६ एप्रिल रोजी ७३ आणि २७ एप्रिल रोजी ९० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. १६३ लोकल फेऱ्या रद्द असतील. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्ताप होऊ शकतं. मेगाब्लॉकदरम्यान पाचव्या रेल्वे लाइनवरील गर्डर, कांदिवली कारशेड लाइन आणि ट्रॅकच्या पूर्वेकडील यार्ड लाइन बदलणे अशा कामांचा समावेश आहे.

हार्बर मार्गावर ब्लॉक, 'या' मार्गावरील ट्रेन बंद

हार्बर रेल्वेवर रात्री रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार दिनांक २७.०४.२०२५ रोजी हार्बर मार्गावर आणि विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT