Nitin Desai News  Instagram
मुंबई/पुणे

Nitin Desai News: नितीन देसाईंनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू फॉरेन्सिक लॅबकडे, लवकरच उलगडा होणार

Nitin Desai News: नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणावरून रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

Nitin Desai Death Update: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक एक्झिट घेतल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्या निधनाने सिनेसृष्टीत अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न सिनेसृष्टीतील कलाकारांसहित सामान्य नागरिकांना पडला आहे. नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणावरून रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

रायगडचे (Raigad) पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, 'कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात घेऊन गेले आहेत. पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांचं शवविच्छेदन केले जाणार आहे. घरच्यांच्या सांगण्याप्रमाणे एनडी स्टुडिओ येथेच नितीन देसाई यांच्या वर अंत्यसंस्कार होणार आहे. देसाई यांच्यावर पुढील एक ते दोन दिवसांमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत'.

दरम्यान, काही मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आले आहेत. या फॉरेन्सिक लॅबकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या सखोल चौकशीनंतर आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल, असेही रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पुढे म्हणाले.

नेमकं काय झालं?

नितीन देसाई हे रात्री दिल्लीवरून मुंबईला आले. रात्री मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कर्जतच्या एनडी स्टुडीओत पोहोचले. त्यांनी मॅनेजरकडून व्हॉईस रेकॉर्डर घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर सकाळी मॅनेजर सकाळी देसाई यांच्याकडे गेल्यानंतर ते मृतावस्थेत आढळले. आता व्हॉईस रेकॉर्डरवरुन पोलीस पुढचा तपास करत आहेत.

नितीन देसाईंवर कर्जाचा डोंगर

नितीन देसाई यांच्यावर २४९ कोटींचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणीमुळे देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं का? की कुणी आर्थिक दबाव आणत होतं? याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bird Flu : मोठी बातमी! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी, कुठे लागू केला आहे हा निर्णय?

Maharashtra News Live Update : रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

Raja Shivaji Show Cancel: मुंबईतल्या प्रसिद्ध थिएटरमध्ये 'राजा शिवाजी'चा शो अचानक रद्द; प्रेक्षकांचा संताप अनावर

Cucumber Benefits For Face: उन्हाळ्यात चेहऱ्यावर काकडीचा असा करा वापर, पार्लरमधील महागडे फेशियल विसरून जाल

Video : जुगाड! टॅलेंट भारताबाहेर जायला नको; पठ्ठ्याने २ शेळ्यांना स्कुटीच्या डिक्कीत बसवून गावभर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT