Uday Samant Saam TV
मुंबई/पुणे

Uday Samant : थरारक घटना! उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले; भर समुद्रात अचानक बंद पडली बोट

राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली.

साम टिव्ही ब्युरो

Uday Samant Speed Boat News : रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. समुद्रातून बोटमधून प्रवास करत असताना, राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली. अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली. सुदैवाने उदय सामंत हे सुखरूप आहे. (Maharashtra Political News)

नेमकं काय घडलं?

राज्याचे आरोग्यमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे रायगडमधून गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने स्पीड बोटमधून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या स्पीड बोटीचे अचानक इंजिन बंद पडले. त्यामुळे समुद्रातील लाटांमुळे त्यांची बोट भरकटली. बोट बंद पडल्यामुळे बोटीच्या सर्व यंत्रणा देखील बंद पडल्या.

त्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ SOS हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठीण झाले होते. समुद्रात अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट (Boat) बोलवली.

दरम्यान, काही वेळातच, घटनास्थळी दुसरी बोट दाखल झाली. त्यामुळे उदय सामंत यांच्या भरकटत चाललेल्या स्पीड बोटीला वेळेवर मदत मिळाली. सुदैवाने या घटनेत उद्योगमंत्री उदय सामंत हे बालबाल बचावले. दुसऱ्या बोटीवर चढताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आता ते मुंबईत आल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Kantara Chapter 1 OTT : 'कांतारा' चे वादळ 'ओटीटी'वर कधी येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT