MP Rahul Shewale Saam Tv
मुंबई/पुणे

राहुल शेवाळेंवरील अत्याचाराच्या आरोपांवर पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (ShivSena) खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत पीडित महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या आरोपांवर आता खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी सौ. कामिनी शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोप खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने केले असल्याचा आरोप कामिनी शेवाळे यांनी केला आहे.

शेवाळे (Rahul Shewale) यांनी २०२० पासून लग्नाचे आमीष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून, लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती दिली त्यावर आपण विश्वास ठेवला, असंही या आरोपात म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात काय म्हटले आहे?

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या २५ वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून, याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती, असं या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

या तक्रारीची दखल घेऊन ११ जुलै २०२२ रोजी सदर महिलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता. आणि तिला सुमारे ८० दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे, असंही यात म्हटले आहे.

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते!

-सौ. कामिनी राहुल शेवाळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT