Rahul Gandhi Saam TV
मुंबई/पुणे

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अखेर परवानगी; पण 'या' ३० अटी-शर्तीचे करावे लागणार पालन

Rahul Gandhi Pune event : राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र काँग्रेसला ३० अटींचे पालन करावे लागणार आहे.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhis Pune Chhatron Ki Goonj : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काँग्रेस पक्षाला ३० कडक अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. पुण्यातील ऐतिहासिक एस. एस. पी. एम. (SSPMS) मैदानावर पार पडणाऱ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

(Rahul Gandhi’s August 22 Pune Event Approved: No Drone Photography and 30 Conditions Imposed by Police)

राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम परिसरात ड्रोनद्वारे छायाचित्रीकरण (ड्रोन शूटिंग) करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, मुख्य व्यासपीठ (स्टेज) अतिसुरक्षित ठेवण्यात येणार आहे. तसेच, कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि महिलांची सुरक्षा लक्षात घेता, योग्य त्या सर्व उपाययोजना व दक्षता घेण्याच्या कडक सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत.

कोणत्या ३० अटी व शर्ती?

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये.

  • स्टेज आणि मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकाकडूनच तयार करून घ्यावा.

  • कार्यक्रमासाठी येणाऱ्या पुरुष व स्त्रियांसाठी आसन व्यवस्था वेगळी करावी.

  • स्टेज तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) घ्यावे.

  • कार्यक्रमाशी संबंधित सर्व विभागांची परवानगी तसेच नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करावेत.

  • नागरिकांना येण्या-जाण्यासाठी कमीत कमी चार दरवाजे करावेत.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांची (स्त्री-पुरुष) व्यवस्था करावी. तसेच जास्तीत जास्त महिला स्वयंसेवकांचा वापर करावा.

  • योग्य प्रकाश योजना, आग प्रतिबंधक साहित्य, पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची पुरेशी व्यवस्था करावी.

  • कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवण्याचे बंधन आयोजकांवर राहील.

  • गर्दी, गोंगाट होणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • ध्वनीप्रदूषण अधिनियम २००० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील नियमांचे तंतोतंत पालन करावे.

  • वाहनांसाठी आवश्यक पार्किंगची सोय करावी आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • संपूर्ण परिसरात दिवस-रात्र चालणारे सी.सी.टी.व्ही (CCTV) कॅमेरे कार्यान्वित करावेत.

  • जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • आक्षेपार्ह प्रतिमा, चित्रे किंवा बॅनर्स लावू नयेत. अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी आयोजकांची राहील.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी हाय लाईट्सचे फोकस (बीम लाईट्स) आकाशात सोडण्यात येऊ नयेत.

  • वीज खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करावी.

  • अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त करून घ्यावे.

  • एअरपोर्ट अथॉरिटी व CISF यांनी घालून दिलेल्या अटींचे योग्य पालन करावे.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे फोटोग्राफी करण्यास सक्त बंदी आहे.

  • कोणाचीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही याची सर्व जबाबदारी आयोजकांची राहील.

  • महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी.

  • आणीबाणीच्या प्रसंगी पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल यांच्यासाठी राखीव रस्ता उपलब्ध ठेवावा.

  • कायदा व सुव्यवस्थेस बाधा आल्यास कार्यक्रम रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांकडे राहील.

  • महिलांच्या तपासणीसाठी महिला चेकिंग पॉईंटवर फक्त महिला स्वयंसेवकांचीच नेमणूक करावी.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये.

  • स्टेजसमोरील 'D' (डी-झोन) ला संपूर्ण बॅरिकेटींग करण्यात यावे.

  • VIP व आयोजक कमिटी सदस्यांनाही प्रवेशिकेशिवाय (Pass) प्रवेश दिला जाऊ नये.

  • नाहरकत हे वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतरच ग्राह्य धरले जाईल.

  • जागेबाबत वाद निर्माण झाल्यास नाहरकत परवाना तात्काळ रद्द केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT