solar system , maval saam tv
मुंबई/पुणे

Maval : आता मावळ तालुक्यातील 'या' गावात वीज कधीच जाणार नाही; जाणून घ्या कारण

पुसाणे ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

दिलीप कांबळे

Maval News : सोलर सिस्टिमवर चालणार मावळातील (maval) पुसाणे (pusaane) हे गाव (village). हा प्रयाेग करणारे राज्यातील (maharashtra) पुसाणे हे पहिले गाव ठरणार आहे. एका नामांकित विदेशी कंपनीने तालुक्यातील पुसाणे गावाची निवड करून भव्यदिव्य असा सोलर सिस्टीम प्रकल्प उभा केला आहे. (Maharashtra News)

त्यामुळे आता गावात लाईट चोवीस तास सुरू राहणार आहे. या सोलर सिस्टीममुळे रस्त्यावरील लाईट, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर, शाळा (school), पिण्याच्या पाण्याच उपसा केंद्रावरील मोटार सोलर उर्जावर चालणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर जाण्याची गरज भासणार नाही.

ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते, कारण की आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि कामगार वर्गाला याचा फटका बसतो. महिलांची तर पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र मावळातील पुसाणे गाव हे या त्रासापासून मुक्त होणार आहे.

सोलर सिस्टीममुळे चोवीस तास लाईट आणि पाणी गावात राहणार आहे. पूसाणे गावाची दीड हजार लोकसंख्या आहे. या ग्रामपंचायतीने वीस लाख रुपये खर्च केला आहे. तर विदेशी कंपनीने कोट्यवधी रुपयांचा खर्च या सोलर सिस्टीम प्रकल्पा करिता केला आहे. केवळ सोलर सिस्टीमच नव्हे तर बॅटरी आणि जनरेटर बॅकअप देखील या प्रकल्पात देण्यात आला आहे. त्यामुळे पुसाणे गावातील ग्रामस्थ लाईट जाण्याच्या त्रासापासून मुक्त होणार आहे.

पुसाणे हे राज्यातील पहिलेच ग्रामीण भागातील हे गाव आहे. जिथे आता ग्रामस्थ लोड शेडिंगच्या त्रासातून मुक्त होणार आहेत. तर हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बघावा अशी विनंती ग्रामस्थ करू लागलेत.

सोलर सिस्टीम प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना (farmers) शेतात पाणी सोडणे सोपे होणार तर विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहणार नाही. तर महिलांची पाण्याची वणवण थांबणार असल्याने (maval) पुसाणे गावाचं नंदनवन होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT