Sinhgad Flyover: Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुणेकरांना सिंहगड रस्त्यावर आणखी महिनाभर वाहतुकीचा त्रास, ११८ कोटींचा उड्डाणपूल तयार होण्याच्या मार्गावर

Sinhagad Road Flyover: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल पावसामुळे रखडला असून, हे काम आता जुलै अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेनं हाती घेतलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे. उड्डाणपुलावरील कामकाज पूर्ण होण्यासाठी आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने हा पूल १५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, संततधार पावसामुळे पुलाच्या कामाचे नियोजन रखडले आहे. उड्डाणपुलाचे काम जुलै अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

माणिकबाग ते हिंगणे दरम्यानचा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली होती. तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होते. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार होता. मात्र, पावसामुळे कामाचा वेग संथ झाला आहे. यामुळे उड्डाणपूल जुलै अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंहगड उड्डाणपूल बांधण्याचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झाले होते. या संपूर्ण प्रकल्पासाठी ११८ कोटी रूपयांचा खर्च झाला असून, तीन टप्प्यांमध्ये हा उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. यामध्ये राजाराम पूल चौक, विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या दोन टप्प्यातील उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले.

या दोन्ही पुलांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन १५ जून रोजी होणार होते. मात्र, जून महिन्यात संततधार सुरू झाल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. हे काम जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना या तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात ३० वर्षीय विवाहितेची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास, कारण अस्पष्ट

Maharashtra News Live Update: लग्नातील डीजे बंद केल्याच्या वादातून औरंगपुरात तुफान राडा

Drishyam 3 : अखेर २ ऑक्टोबरचं रहस्य २१ मे ला उलगडणार; 'दृश्यम ३' येतोय, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला धमाकेदार सुरूवात

Mango Eating Tips: जेवल्यानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Gavhachi Khichdi Recipe: जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टीक खायचंय? बनवा गरमागरम गव्हाची खिचडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT