Crime News Saam
मुंबई/पुणे

Pune Robbery: पुणे तिथे काय उणे! प्लास्टिकची बंदूक दाखवून सोन्याच्या दुकानात घुसले, २५- ३० तोळे लुटून आरोपी फरार; मालक बघतच राहिला

Daylight Robbery in Pune Thieves Snatch 25-30 Tolas of Gold: श्री ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकत २५ ते ३० तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धायरी येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकत २५ ते ३० तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवत ही लुट केली असल्याचं तपासात समोर आलं आहे.

दुकानाचे मालक विष्णू दहीवाळ यांनी यासंदर्भात तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपी फरार झाले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आरोपींनी थरारक दरोडा टाकला. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात श्री. ज्वेलर्सचे दुकान आहे. हे दुकान विष्णू दहीवाळ यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. या दुकानात तीन दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला.नंतर प्लास्टिकच्या बंदूकीचा धाक दाखवून आरोपींनी ज्वेलर्सच्या दुकानातून २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटले.

सोने लुटल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. आरोपी फरार होत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी सोने चोरून पळ काढताना दिसत आहे.

या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT