Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News : पुण्यात तोडफोडीचे सत्र कायम! सोसायटीमधील CCTV आणि वाहने फोडली, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune Crime News : पुण्यात मध्यरात्री काही तरुणांनी पार्किंगमधील गाड्या आणि CCTV फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

पुण्यात तरुणांनी पार्किंगमधील गाड्या आणि CCTV फोडले

मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने परिसरात दहशत आणि भीतीचं वातावरण

नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील काही दहशत माजवणाऱ्या तरुणांनी हातात हत्यार घेऊन पार्किंगमधील गाड्या फोडल्या असल्याचं समोर आलं आहे. इतक्यावरच न थांबता या तरुणांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या एका सोसायटी मध्ये काही तरुणांनी दहशत माजवली. एका सोसायटी मध्ये रात्री १ वाजण्याच्या दरम्यान ३ ते ४ तरुणांनी हातात शस्त्र घेऊन प्रवेश केला. सुरवातीला, पार्किंग मध्ये असलेल्या सी सी टिव्ही फोडण्याच्या यातील एकाने प्रवेश केला. या नंतर ही टोळी थेट सोसायटी चे जिने चढून वरील काही मजल्यांवर गेली.

त्यानंतर खाली आल्यावर पुन्हा एकदा या टोळक्याने पाहणी केली आणि पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हातातील धारदार शस्त्राने त्याची तोडफोड केली. कारवाईच्या भीतीने आणि दहशत निर्माण व्हावी म्हणून यातील एकाने तर थेट सी सी टिव्ही वर हातातील धारदार शास्त्राने मारले आणि त्याचे सुद्धा नुकसान केले.

या घटनेने सोसायटीतील आणि तेथील परिसरात भीतीपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील हे तोडफोडीचं सत्र नवीन नसून गेल्या महिन्याभरात अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दखल घेऊन अशा दहशत माजवणाऱ्या तरुणांना त्वरित अटक करावी यासाठी नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT