Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: कुणी कपडे फाडले, कुणी झिंज्या उपटल्या, महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारी; VIDEO व्हायरल

Women groups brawl in Pune: किरकोळ कारणावरून महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bhagyashree Kamble

किरकोळ कारणावरून महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही घटना पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत घडली आहे. या हाणामारीत एक महिला आणि दोन पुरूष असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत एक हाणामारीचा प्रकार घडला आहे. महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. य किरकोळ कारणावरून महिलांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एक महिला आणि पुरूष गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवकर, विलास शिंदे, शैलेश कुदळे, राहुल कर्डिले, शिल्पा हरिहर, मीना वाघाडे, कोमल आखाडे, दीपाली पाडूळे आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तातडीनं धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT