Pune Water News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Water News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Water Supply In Pune: टाकीच्या पाईपलाईनवरील महत्त्वपूर्ण काम करण्याच्या उद्देशाने पुण्यातील विविध ठिकाणी पाणी येणार नाही. तेव्हा महानगरपालिकेने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

Saam Tv

Pune Water Supply: पुण्यात गुरुवारी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठा वितरण पायाभूत व्यवस्थेच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. हरकानगर भवानी पेठेतील जल वाहिनीवर कामाच्या निमित्ताने विविध भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेद्वारे गुरुवार (२६ डिसेंबर) हरकानगर भवानी पेठेत काम केले जाणार आहे. भवानी पेठेतील पार्वती एमएलआर टाकीच्या पाईपलाईनवर ४५० मिमीचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. पालिकेचे कर्मचारी ३०० मिमीचा पाईप ५०० मिमी पाईपला जोडण्याचे कामही करणार आहेत. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहून पुढे शुक्रवारी (२७ डिसेंबर) सकाळी उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

दरम्यान पुण्यातील पार्वती एमएआर टाकी, शंकरशेठ रोड, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडियम, लक्ष्मीनारायण टॉकीज (मागचा भाग), पार्वती दर्शन (काही भाग), मित्र मंडळ कॉलनी (काही भाग, सारस बाग, खडकमल अली, शिवाजी रोड, मुकुंद नगर, महर्षी नगर (काही भाग), टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज, मीरा आनंद परिसर आणि श्रेयस सोसायटी या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणी वितरण व्यवस्थेसाठी बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि पाईप कनेक्शन जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे. तेव्हा पाणीपुरवठा होणार नसल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT