Private water tankers lined up in Pune as demand surges amid severe water shortage. Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात टँकर माफियांचा सुळसुळाट, साम इन्व्हेस्टिगेशनमध्ये टँकर माफियांचा भांडाफोड

Pune Water Crisis Tanker Mafia Exposed: ऐन उन्हाळ्यात राज्यात पाणी टंचाई निर्माण झालीय. आता याच टंचाईची संधी साधून जनतेच्या लूट करण्यासाठी टँकर माफिया सक्रीय झाले आहेत. पुणेकरांचीही अशीच लूट सुरू झालीय. कशी सुरू आहे लूट? कुणाचा आहे टँकर माफियांना आशीर्वाद ? साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये कसा पर्दाफाश झालाय.. पाहूयात.......

Bharat Mohalkar

उन्हाळा सुरू झाला की पुण्यात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते आणि सुरू होतो टॅंकर माफियांचा सुळसुळाट... इमारती उभ्या राहतात..महापालिकेच पाणी पुरत नाही आणि याच टंचाईचा फायदा घेत खासगी टँकर माफियांनी इथे सुरू केलाय लुटीचा गोरखधंदा... नागरिकांच्या आरोपांनंतर साम टीव्ही पोचलं ते थेट टँकर जिथून पाणी भरतात त्या ठिकाणी...

खासगी टँकर चालकांचं म्हणणं मात्र वेगळं होतं.. आपण नाममात्र नफा कमावत असल्याचं या टँकर चालकांनी सांगितलंय... मात्र त्यानंतर साम टीव्हीनं महापालिकेकडून आकडेवारी मिळवली... त्यात मात्र चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीय.. एवढंच नाही तर या लुटीची मोडस ऑपरेंडीच साम टीव्हीच्या हाती लागली..

महापालिकेच्या दहा हजार लीटर पाण्याच्या टँकरची किंमत 1303 रुपये इतकी आहे.. तर महापालिकेकडून खासगी टँकर चालकांनी पाणी घेतल्यास त्यांना 734 रुपयांना दहा हजार रुपयांना विकलं जातं... त्यानंतर टँकर पाण्याच्या पॉईंटपासून सोसायटीपर्यंत पोहोचतात...त्यासाठीचा खर्च 600 रुपये येतो, असं टँकर चालक सांगतात... मात्र खरी लुट सुरू होते ती यानंतर... हे टँकर माफिया नागरिकांची अडवणूक करतात आणि हेच पाणी दीड ते दोन हजार रुपयांना विकतात... पुण्यात अशा प्रकारचे 250 ते 300 खासगी टँकर चालक आहेत... त्यांच्या दररोज 3200 फेऱ्या होतात... याच पाण्यातून टँकर माफिया दररोज 50 लाखांपेक्षा जास्त उलाढाल करत असल्याचं समोर आलंय..

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर साम टीव्हीनं महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना गाठलं... यावेळी त्यांनी या टँकर माफियांवर महापालिकेचं नियंत्रण नसल्याची कबुलीच दिली... नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करणं ही महापालिकेची जबाबदारी... त्यासाठी महापालिकेनं समान पाणी वाटपाचं धोरण आणण्याचं जाहीर केलं... मात्र या धोरणाची अजुनही अंमलबजावणी का होत नाही....पाण्यासारखी मुलभुत गरज १५ हजार कोटीचं बजेट असलेली महापालिका का पुरवू शकत नाही की त्यामागे खासगी टँकर चालकांचं उखळ पांढऱं करण्यासाठीच अधिकारी आणि टँकर माफियांची लॉबीचं साटंलोटं आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.. त्यामुळे महापालिकेनं तातडीनं टँकर माफियांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज आहे.. अन्यथा साम टीव्ही टँकर माफिया आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीचा पर्दाफाश करत राहणार, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT