Mangesh Chivte saam tv
मुंबई/पुणे

Pune : एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् पुण्यात बंड शमलं! चिवटेंची तलवार म्यान, भैय्या मानेंसह बंडखोरांची माघार

Bhaiyya Mane withdraws Pune graduate constituency nomination : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महायुतीची बंडखोरी अखेर शमली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मंगेश चिवटे आणि भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Namdeo Kumbhar

Mangesh Chivte withdraws nomination from Pune teacher constituency, : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महायुतीमधील मोठी बंडखोरी अखेर शमली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे महायुतीतील मतविभाजनाचा मोठा धोका टळला असून, या दोन्ही जागांवर आता भाजपचे अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.

पुण्यात रात्रीत काय घडलं?

शिवसेनेचे (शिंदे गट) नेते मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून माघार घेण्याचे थेट आदेश दिल्यानंतर चिवटे विधान भवनात पोहोचले आणि त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.

शिवसेनेत पक्षाचा आदेश हा शेवटचा मानला जातो. एकनाथ शिंदे साहेबांनी अर्ज मागे घ्यायला सांगितला, म्हणून मी तो मागे घेतला आहे. मी पक्षावर किंवा युतीवर अजिबात नाराज नाही, अशी प्रतिक्रिया चिवटेंनी दिली.

पदवीधर मतदारसंघातून भैय्या मानेंचा युटर्न:

पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रताप उर्फ भैय्या माने यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

मी मुळात महायुतीकडूनच तिकिट मागितले होते, पण राजकीय समीकरणांमुळे ही जागा भाजपकडे गेली. अपक्ष लढल्यास महायुतीचे नुकसान झाले असते. कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण युतीचा धर्म पाळत मी कोणत्याही दबावाशिवाय माघार घेत आहे, अशी प्रतिक्रिया भैय्या माने यांनी दिली.

महायुतीचे अधिकृत उमेदवार कोण?

बंडखोरांनी माघार घेतल्यामुळे पुण्यातील दोन्ही जागांवर महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे (भाजप) आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव (भाजप) हे अधिकृत महायुतीचे उमेदवार असतील. चिवटे आणि भैय्या माने यांच्या या बंडखोरीच्या माघारीमुळे महायुतीमधील मतविभाजनाचे गणित सुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salad Benefits: वजन कमी करायचं आहे? मग राज जेवताना खा सालाड,मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?

Maharashtra News Live Update: पंढरपूर सांगोल्यात भीषण दुष्काळ! पेरलेली बाजरी जळून खाक

Sarvapitri Amavasya Date : सर्वपित्री अमावस्या कधी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्वाचे उपाय

दिग्गज महिला नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली, राजकारणात हळहळ

SCROLL FOR NEXT