Pune Truck Collapsed  Saam Digital
मुंबई/पुणे

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Pune News : पुणे महापालिकेकडून बेलबाग चौकाजवळच सिटी पोस्ट कार्यालयानजीक मैलापाणी वाहिन्या दुरूस्तीचे काम सुरू होते. यावेळी महापालिकेचा ट्रक थेट २५ फूट खोल खड्ड्यात कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sandeep Gawade

Pune Latest News : पुण्यातील बेलबाग चौकाजवळच सिटी पोस्ट कार्यालय आहे. मैलापाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून संबंधित वाहिन्या दुरूस्तीचे काम सुरू होते. मात्र या दुरुस्तीसाठी गेलेला महापालिकेचा ट्रक थेट २५ फूट खोल खड्ड्यात कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र सध्या महापालिकेच्या या कामाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बेलबाग चौक परिसरात मैलापाणी वाहिन्यांबाबत काही दिवसांपासून अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिकेने आज संबंधित वाहिन्या दुरूस्तीचं काम सुरू केलं होतं. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास महापालिकेकडून मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक व कामगारांना या भागात पाठवण्यात आलं होतं. ट्रक आणि कामगार सिटी पोस्ट कार्यालयात पोहोचले आणि चेंबरमधील कामाला सुरुवात केली. बाजूलाच महापालिकेचा ट्रक थांबला होता.

काम सुरू असताना अचानक ट्रक थांबलेल्या ठिकाणची जमीन खचली आणिल ट्रक सरळ २५ फूट जमिनीत गेला. ट्रकचा केबीनचा भाग वगळता संपूर्ण ट्रक जमीनीत गाडला गेला. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.

ट्रकखाली मोठा खड्डा पडला होता आणि त्यात मोठ्या प्रमाणात पाणीही साचलं. त्यामुळे संपूर्ण ट्रक पाण्यात बुडाला. अखेर हा ट्रक बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करावं लागलं. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि खड्ड्यात पडलेल्या ट्रक काढण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुहास जाधव यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT