Pune Palkhi Sohala 2025 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Palkhi 2025: ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखींचा पुण्यात मुक्काम! वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Diversion Due to Palkhi: आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात असणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

पंढरपुरच्या वारीला दरवर्षी लाखो वारकरी जातात. पंढरपुरच्या वारीला यंदाही अनेक वारकरी निघाले आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. काल संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाली आहे. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पुण्यातील वाहतूकीत बदल ( Changes in Pune Route Of Wari)

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

बोपोडी, खडकी, वाकडेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, नानापेठ, बेलबाग चौक, पासोड्या विठोबा मंदिर आदी भागांतील वाहतूक पूर्णपणे किंवा काही काळासाठी बंद राहणार आहेत. पालखी मार्गावर शहर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २० जून रोजी पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बोपोडी ते खडकी बाजार रस्ता, तसेच जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील काही भाग वाहतुकीसाठी बंद राहतील.

आज पुण्यातील हे रस्ते बंद? (Pune Road Closed)

संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, जिजामाता चौक, बेलबाग चौक ते निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिरापर्यंत असलेल्या मार्गांवर बंदी

कुठले मार्ग राहणार खुले? (Pune Road Options To Travel)

सेनापती बापट रस्ता, नळ स्टॉप, शास्त्री रोड, रांका चौक, रामेश्वर चौक, फडके हौद चौक हे मार्ग वापरावेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT