Pune protest against Eknath Shinde Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Pune MNS News : एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'चा नारा दिल्यानंतर 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात', असं म्हणत पुण्याच्या बालगंधर्व चौकात मनसेनं आंदोलन केलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेत एकनाथ शिंदेंचा निषेध केला आहे.

Prashant Patil

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होता. मात्र, ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर तो निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केलाय. यावेळी त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात', असं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'चा नारा दिल्यानंतर 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात', असं म्हणत पुण्याच्या बालगंधर्व चौकात मनसेनं आंदोलन केलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेत एकनाथ शिंदेंचा निषेध केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पाडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात', अशी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचं मनाला लावून घेण्याची गरज नाही. त्याच्यावरून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची गरज नाही. मी शिंदेसाहेबांशी बोलतो. भाषण बघतो. आमच्या सारख्या विधानसभेत २५ वर्ष राहिलेल्या व्यक्तीने पटकन उत्तर देऊन मत व्यक्त करण्यासारखं काही नाही. मी स्वत: एकनाथसाहेबांशी बोलेल. भाषण बोलेल. त्यानंतर मी यावर भाष्य करेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT