Pune teachers constituency election latest news saam tv
मुंबई/पुणे

पुणे शिक्षक निवडणुकीत ट्विस्टवर ट्विस्ट! सानप बाजी मारणार की सावंतांची बंडखोरी ठरणार निर्णायक? डार्क हॉर्स’ ठरणार कोण?

Pune Teachers' Election: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार संपलाय. प्राध्यापक सचिन सानप यांची उमेदवारी आणि दत्ता सावंत यांच्या बंडखोरीमुळे पुणे शिक्षक निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

Bharat Jadhav

  • पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार संपलाय.

  • २३ ऑक्टोबरचे मतदान उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरणार

  • शिवसेनेने प्राध्यापक सचिन सानप यांना स्वतंत्र उमेदवारी दिलीय.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक निवडणुकीच्या प्रचार संपला आहे. उमेदवारांसाठी मतदानाचा २३ ऑक्टोबर हा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. कारण पहिला पसंतीक्रम मतदार नेमका कोणाला देतोय यावरच विजयाची सगळीच गणितं निश्चित होणार आहे, म्हणूनच शेवटच्या दिवशी सर्व प्रमुख उमेदवारांनी पत्रकार परिषद घेत मतदान करण्याचे आवाहन केले.

पुणे पदवीधरसाठी मविआविरूद्ध महायुती अशी थेट दुरंगी लढत असली तरी पुणे शिक्षक साठी तसं नाहीये. भाजपच्या नाशिक पँटर्नचा बदला घेण्यासाठी शिवसेनेनं पुणे शिक्षक साठी प्राध्यापक सचिन सानप यांच्या रुपाने आपला स्वतंत्र उमेदवार दिलाय. तर मविआकडून इच्छूक असलेले माजी आमदार प्राध्यापक दत्ता सावंत यांनीही रासपची उमेदवारी घेत बंडखोरी केलीय. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसवागकर भाजपचे कौस्तुभ गावडे शिवसेनेचे प्राध्यापक सचिन सानप आणि रासपतर्फे माजी आमदार दत्ता सावंत अशी चौरंगी लढत होतेय.

त्यातील आसगावकर आणि गावडे हे दोन्ही कोल्हापुरचे उमेदवार आहेत तर दत्ता सावंत सोलापूर आणि प्राध्यापक सचिन सानप हे पुणेकरांचे प्रतिनिधीत्व करत असल्याचं सांगतात त्यांना कपिल पाटील यांची शिक्षक भारती आणि प्राध्यापकांच्या एम फुक्टो अॅण्ड स्पुक्टो या प्रमुख संघटनाचा पाठिंबा आहे, त्यामुळे प्राध्यापक सचिन सानप हे गोकुळ गितेंप्रमाणे बाजी मारून या निवडणुकीली डार्क हॉर्स ठरणार का हेच पाहाचंय?

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ

एकूण मतदार: ६१ हजार ९४०

एकूण मतदान केंद्रे: ३१०

उमेदवार: ३०

जिल्हा मतदान केंद्रे मतदार संख्या

पुणे ७२ १६,८२२

सोलापूर ७६ १५,३०३

सातारा ४४ ९,४५४

सांगली ४८ ८,०६२

कोल्हापूर ७० १२,२९९

एकूण ३१० ६१,९४०

शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी बालेवाडी, पुणे येथे होणार आहे.

पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असून, सातारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. साताऱ्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ आणि पदवीधरसाठी ९३ अशी एकूण १३७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षक मतदारसंघाचे ९,४५४ तर पदवीधर मतदारसंघाचे ४७,४६३ मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Nitesh Karale Crying : ६ वर्षासाठी राष्ट्रवादीतून हाकालपट्टी, कराळे मास्तर ऑन कॅमेरा ओक्साबोक्शी रडले

Running or Swimming: हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणं की पोहणं? कोणता व्यायाम ठरतो अधिक फायदेशीर?

संगीत क्षेत्राला मोठा धक्का! दिग्गज गायकाचे निधन, सिनेसृष्टीत हळहळ

Headache Type : तुम्हाला होणारी डोकेदुखी नेमकी कोणती ? लक्षणांवरून ओळखा डोकेदुखीचे प्रकार

SCROLL FOR NEXT