Swargate Bus Depot Case Saam Tv
मुंबई/पुणे

Swargate shivshahi Case : दत्ता गाडेचा मोबाईल पोलिसांना मिळाला, तांत्रिक तपासानंतर काय समोर आले?

Pune Swargate Shivshahi Case : आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केल्यानंतर पोलिसांनी अनेक गोष्टींची माहिती मिळाली आहे.

Namdeo Kumbhar, सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

Swargate St Depot Case: पुण्यातील शिवशाही बलात्कार प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल मिळाला आहे. पोलिसांकडून त्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी आणि तरूणीमध्ये याआधी कोणतेही संभाषण झाले नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, शिवशाही बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून दत्ता गाडे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. (No Prior Communication Between Accused and Victim in Shivshahi Rape Case, Says Technical Investigation)

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

२६ वर्षीय पीडित तरुणी आणि दत्ता गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे. दत्ता गाडे वापरत असलेला मोबाइल हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आले आहे.

शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर नराधम दत्ता गाडे याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पुणे पोलिसांनी शिवशाही बस फॉरेन्सिक लॅब पाठविली असून, गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुण्यातील स्वरागटे बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारी रोजी दत्ता गाडे याने फलटणला जाणाऱ्या तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला, त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण समजल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Health Tips : मानेचं दुखणं हे तीव्र डोकेदुखीचं कारण असू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं, असं का होतंय?

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT