Pune Swargate Bus Deopt Case 
मुंबई/पुणे

Pune Swargate Bus Deopt Case: बसजवळ ड्रायव्हर आणि कंडक्टर होते, पीडितेनं सांगितली आपबीती, गाडेला पकडणार तोच...

Pune Swargate Bus Deopt Case: स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीचा तपासणीसाठी महिला डॉक्टर नव्हत्या? असा आरोप वसंत मोरेंनी केलाय.

Bharat Jadhav

स्वारगेट अत्याचार प्रकरणी नव-नवीन खुलासे होत आहेत. आरोपी दत्ता गाडे स्वारगेटसह इतर बस स्थानकावरही आपले सावजच्या शोधात असायचा. त्याच दरम्यान याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. पीडिता मुलीची आरोग्य तपासणीवेळी महिला डॉक्टर नव्हती तर एका पुरुष डॉक्टरकडून तपासणी केली गेल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलाय. पीडितेची भेट घेतल्यानंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर वसंत मोरे यांनी एक मोठा दावा केलाय.

२६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी बस शेजारी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते. त्यांना पीडितेने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पीडितेने त्यांना आरोपी गाडेची गैरकृत्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडे तेथून पसार झाला होता, अशी माहिती वसंत मोरे यांना पीडितीने दिली होती.

काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट अत्याचार पीडितेची भेट घेतली. त्यावेळी पीडितेने त्यांच्याकडे न्यायाची दाद मागितली. त्याचवेळी पीडितेने आपल्या आरोग्य तपासणीबाबत मोठा खुलासा केला. तरुणी म्हणाली होती की, फिमेल डॉक्टरांकडून माझी तपासणी करा. परंतु तिची तपासणी पुरुष डॉक्टराकडून करण्यात आल्याची माहिती तिने मोरेंना दिली. यावर बोलातना वसंत मोरे म्हणाले,कायद्याने फिमेल डॉक्टरने तिची तपासणी करणं गरजेचं होतं.

परंतु तिची तपासणी पुरुष डॉक्टरांनी केली. हे भयानक आहे. इतका विचित्र प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांना समजलं नाही. ती सुशिक्षित तरुणी आहे. ती फस्ट्रेट झाली असल्याचं मोरे म्हणाले. त्याचवेळी वसंत मोरे यांनी तिला सोशल मीडिया पाहू नको, असा सल्लाही वसंत मोरे यांनी दिलाय. संमतीने हे लोक म्हणतात, पण तो अत्याचार झाल्यानंतर कलकत्त्याला झालेला प्रकार समोर आला.

मी गाडीतून उतरल्यानंतर तो मुलगा राईट साईडला गेला आणि मी डाव्या बाजूला ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते तिथे गेले. त्यांना मी सांगितलं तो मुलगा चाललाय त्याने माझ्यावर अतिप्रसंग केलाय. त्याच्या मागे पळाले पण होते. मात्र, तो तिथून पळून गेला. सगळा घटनाक्रम त्याने सांगितला. त्यानंतर त्यांनी मुलीला सांगितलं जाऊद्या वगैरे म्हणून...असंही मोरेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT