Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News: धडापासून शिर वेगळं अन् हात- पाय मोडून विहीरीत फेकलं, अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय काय?

Shocker Severed Body Found in Well: अहिल्यानगरच्या दाणेवाडी येथे एका विहीरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे शीर धडापासून वेगळं आणि हात पाय मोडून विहीरीत फेकलं आहे.

Bhagyashree Kamble

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहीरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे अज्ञात व्यक्तीची अमानूषपणे मारहाण करून आरोपीनं मृतदेह विहीरीत फेकलंय. शीर धडापासून वेगळं आणि हात पाय देखील मोडून विहीरीत फेकलं आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा याचा तपास पोलीस करीत आहेत.

अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहीरीत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाला जबर मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी अमानूषपणे मारहाण नंतर आरोपीने हात पाय आणि शिर धडापासून वेगळे केलं आहे. आरोपीने मृतदेह विहीरीत फेकून दिलंय.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एक १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता आहे. बारावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी पेपरला गेल्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही.

विद्यार्थी हरवला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. विहीरीत सापडलेला मृतदेह विद्यार्थ्याचा आहे की नाही, याचा कसून तपास पोलीस करीत आहेत. मृतदेह ज्या पद्धतीने धक्कादायक स्थितीत आढळला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT