Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

Pune Police: पुण्यामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी दोन ठिकाणी धाडी टाकत ५ महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आले आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची घटना समोर आली.

  • पोलिसांनी स्वारगेट आणि मुकुंदनगर येथे छापा टाकत ५ महिलांची सुटका केली

  • या प्रकरणी पोलिसांनी २ महिलांना अटक केली.

  • पोलिसांनी गुप्त माहिती आणि तोतया ग्राहकाद्वारे ही कारवाई केली.

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या आयुर्वेदिक मसाज सेंटरवर धाड टाकत ५ मुलींची सुटका केली. महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली. पुण्यातील स्वारगेट भागातील २ ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईतून पोलिसांनी ५ मुलींची सुटका करण्यात आली. या दोन्ही कारवाईत २ महिलांना पोलिसांनी अटक केली.

पहिल्या कारवाईतमध्ये मार्केटयार्ड भागात वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला. त्याठिकाणी ४ महिला काम करत असल्याचे आढळून आले. या महिलांना पोलिसांनी नको त्या अवस्थेत पाहिले. त्या चार ही जणींची सुटका करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरची रहिवासी असलेल्या एका महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईमध्ये मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देखील वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिांनी त्याठिकाणी तोतया व्यक्ती पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली. तर ३८ वर्षीय महिलेला या प्रकरणी अटक केली. उच्चभ्रू सोसायटी परिसरामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हे वेश्या व्यवसाय सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT