Crime News Saam Tv (संग्रहित छायाचित्र)
मुंबई/पुणे

पुण्यात कोयता गँगचा हैदोस, टोळक्यांनी दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात मध्यरात्री खळबळ

PUNE KOYTA GANG ATTACK: पुण्यातील शिवाजीनगरमधील तोफखाना परिसरात मध्यरात्री कोयता गँगच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Koyta Gang News : शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात आयान आणि फिरोज हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, परिसरात वाहनांच्या काचा फोडून टोळक्याने दहशत माजवली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी समीर शेख (वय ४८, रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आदित्य बडसकर (वय २२), रोहन शिंदे (वय २३), अथर्व कदम (वय २४) आणि प्रथम मोहिते (वय २१, सर्व रा. बहिरट आळी, शिवाजीनगर गावठाण) या चौघांना अटक केली. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

हल्ल्यामागे फिर्यादी समीर शेख यांचा मुलगा आयान आणि पुतण्या फिरोज यांचा आरोपींशी असलेला पूर्वीचा वाद कारणीभूत आहे. शनिवारी मध्यरात्री चार-पाच जणांचे टोळके कोयते आणि इतर हत्यारांसह तोफखाना परिसरात दाखल झाले. त्यांनी आयान आणि फिरोज यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर टोळक्याने वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT