pune news  Saam tv
मुंबई/पुणे

छत्रपती संभाजी नगर - पुणे महामार्गावर ६ पदरी रस्ता होणार; ग्रीनफिल्ड रोड समृद्धी महामार्गाला जोडणार

pune news : पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव या रस्ता निर्मितीला मान्यता मिळाली आहे . यामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Vishal Gangurde

'त्या' ६ पदरी उन्नत महामार्गाच्या निर्मितीला मान्यता

६ पदरी रस्त्यांच्या काम आणि भूसंपादनाला तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश

करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास ६ पदरी रस्ता जोडणीच्या नवीन आखणीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई : पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर (ॲट ग्रेड) आणि सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्ग) सहा पदरी रस्ता निर्मितीला मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर - जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीला देखील तत्वतः मान्यता देण्यात आलीये.

छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगरदरम्यान सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी दिले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे काम हे ३ वर्षात पूर्ण करावे.रस्ता विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावं.या रस्त्याच्या निर्मितीमध्ये कुठही दिरंगाई होऊ नये. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची अत्यंत वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचं काम विनाविलंब सुरू करावं'.

पुणे ते शिरूर महामार्गावर ३५ किलोमीटर उन्नत महामार्गापैकी ७.४० किलोमीटर लांबीमध्ये जमिनीला समांतर रस्ता, त्यावर रस्ता आणि वरती मेट्रो अशा व्हाया डक्टची निर्मिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाने कराव्या, असे त्यांनी सांगितले.

'छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा (करमाड) ते बिडकीन या ३२.८ किलोमीटर लांबी, बिडकीन ते ढोरेगाव या २६ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्ता निर्मितीच्या कामासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन तातडीने सुरू करावे, असे निर्देश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय घडामोडींना वेग; विजय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा, कोणाची मिळाली साथ?

Maharashtra News Live Update: एफआरपीला १०० रुपये वाढवून देणे हा निर्लज्जपणा; राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर टीका

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये शेततळ्यात सापडला ६ वर्षीय मुलीचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले; वाचा तुमच्या शहरातील २२ अन् २४ कॅरेटचे दर

या फोटोमध्ये लपलाय एक शब्द, अवघ्या १० सेंकदात शोधून दाखवा

SCROLL FOR NEXT