Pune Crime: रिक्षाचे भाडे न दिल्यामुळे चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: रिक्षाचे भाडे न दिल्यामुळे चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील रेसकोर्स परिसरामध्ये एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर (girl) बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवास (Travel) करणाऱ्या या मुली जवळ रिक्षाचे भाडे देण्याकरिता पैसे नव्हते. या गोष्टीचा फायदा घेऊन संबंधित रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळ असलेल्या एका झाडीत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार (Rape) केला आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) याप्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकासह तिघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. सागर बिभीषण बचुटे (वय- २४), विकी कुमार फुलो पासवान (वय- २३) आणि अशोक विर बहादुर थापा (वय- २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (accused) नावे आहेत. याप्रकरणी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आणि ५ जानेवारी २०१९ दिवशी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी आणि तिची मैत्रीण (Friend) रिक्षाने प्रवास करत होते.

यावेळी फिर्यादी आणि त्यांचा मैत्रिणीकडे पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादी बलात्कार केला आहे. तर डिसेंबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये फिर्यादी या फुरसुंगी परिसरात राहत असताना त्यांच्या ओळखीचे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी बरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली होती. दरम्यान तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT