Narendra Dabholkar Case Update Saam TV
मुंबई/पुणे

Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा?

Narendra Dabholkar Case Update: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण झाली आहे. आज पुणे सत्र न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे.

Satish Daud

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण झाली आहे. आज पुणे सत्र न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे. तब्बल ११ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना कोर्ट काय शिक्षा देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी दाभोलकर यांच्या छातीत, तर दुसरी गोळी त्यांच्या डोक्यात लागली होती.

या घटनेत दाभोलकर यांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या घटनेचा तपास पुणे पोलिसांनी (Pune Police) केला होता. मात्र, त्यानंतर हे प्रकरण एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलं.

२०१८ साली गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक एटीएसने पुण्यात येऊन एका आरोपीला अटक केली. त्यानंतर दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील धागेदोरे सापडले. या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले.

सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज कोर्ट निकाल देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT