Pune Sangli Narcotics Connection Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Sangli News: पुण्यातील ड्रग्जचे सांगली कनेक्शन, 300 कोटींचा 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Pune - Sangli Crime News: पुणे क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत कुपवाड मध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 280 ते 300 कोटींचे 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> विजय पाटील

Pune Sangli Narcotics Connection:

पुण्यातील ड्रग्जचे सांगली कनेक्शन अखेर समोर आले आहे. पुणे क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत कुपवाडामध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 280 ते 300 कोटींचे 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अजूनही कारवाई सुरू असून मुद्देमालचा आकडा वाढू शकतो.

पुणे पोलिसांच्याकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी सकाळपासून चौकशी सुरू केली होती. यामध्ये कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसाठा असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊन वर छापा टाकला. यामध्ये 140 किलोच्या 300 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकीत तपासणी केली असता त्या ठिकाणी 140 कीलोचे अंदाजे 300 कोटींचे एमडी ड्रग्जचा साठा हा मिठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून अजूनही कारवाई सुरू आहे.  (Latest Marathi News)

आयुब मकानदार यांच्यावर यापूर्वीही ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल होता तसेच तो सात वर्ष येरवडा कारागरात होता कारागृहात पुण्यातील पुण्यामध्ये असणाऱ्या आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती.

त्यामुळे मकानदार यांच्याकडे हा साठा तात्पुरता स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता. याची कुणकुण लागताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आज दिवसभरात कुपवाड मधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT