Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Pune Police: पुण्यामध्ये जादूटोण्याच्या नावाखाली एका महिलेची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेकडून ३ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे लंपास करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात अघोरी विधी आणि जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला गंडा घालण्यात आला.

  • तब्बल ३ लाख १५ हजारांचा गंडा घालण्यात आला.

  • आरोपीने मंत्रोच्चार आणि अंगाऱ्याचा पेढा देऊन भीती निर्माण केली.

  • महिलेकडील पैसे आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कधी हत्या, अपरहण, हल्ला, बलात्कार यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच पुण्यामध्ये जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादूटोणा करत एका महिलेला तब्बल ३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील सहकारनगरमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात अघोरी विधीच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा घालण्यात आला. सहकारनगरमध्ये राहणारी एक महिला जादूटोण्याला बळी पडली. मंत्रोच्चार,अंगारा आणि अघोरी विधी दाखवून एका महिलेला तब्बल ३ लाख १५ हजार रुपयांचा गंडा घातण्यात आला.या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६ वर्षे) असं फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे. आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेत मंदिरात नेले. त्याठिकाणी मंत्रोच्चार करत अघोरी विधी केल्याचे भासवले. त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन तिच्या भीतीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने आणि रोख मिळून ३ लाख १५ हजार रुपये घेतले. हा संपूर्ण प्रकार २८ जुलैपासून ९ सप्टेंबर दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेता पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीनंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहकारनगर पोलिस करत आहेत. अशा प्रकारने कुणावरही विश्वास ठेवू नका आणि जादूटोण्याला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT