वा रं बहाद्दर! YouTube वर व्हिडिओ पाहून लुटलं ATM; घटना CCTV मध्ये कैद  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

वा रं बहाद्दर! YouTube वर व्हिडिओ पाहून लुटलं ATM; घटना CCTV मध्ये कैद

युट्युब चॅनल वरील व्हिडियो पाहून एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना वाकड पोलिसांनी गजाआड केल आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: युट्युब  चॅनल वरील व्हिडियो  पाहून  एटीएम  फोडणाऱ्या चोरट्यांना वाकड पोलिसांनी  गजाआड  केल आहे. महादेव प्रकाश तीर्थे आणि निशांत ज्ञानेश्वर गुजाळकर अशी एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांची नावं आहेत. महादेव  तीर्थे  आणि निशांत  गुंजाळकर हे एटीएम  फोडत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाकड पोलिसांनी महादेव तीर्थे आणि निशांत गुजाळकर या दोन्ही एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना सापळा लावून अटक केली आहे. या दोन्ही चोरटयांनी मिळून पिंपरी - चिंचवड शहरात जवळपास नऊ एटीएम फोडीचे गुन्हे केल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

तिकडे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन (Nagpur Police) हद्दीतील मोहन नगर भीमसेन चौक येथील ॲक्सिस बँकेचं एटीएम फोडत असलेल्याची माहिती मिळताच नाईट राउंड वर असलेल्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एटीएम फोडण्याची तयारी करत असताना तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी स्वप्नील जांभुलकर, आकाश नाईक, प्रवीण लव्हाळे हे तिघे ही मित्र असून यातील प्रवीण लव्हाळे यानी काही दिवस अगोदर प्लॉट खरेदी केला होता, त्यावर बांधकाम करण्यासाठी पैस्याची आवश्यकता होती. एकंदरीतच एटीएम चोरीच्या घटनांनमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशभरातून आलेल्या २४० खेळाडूंची फसवणूक? संभाजीनगरात बुद्धिबळ स्पर्धेवरून खळबळ|VIDEO

World's Most Expensive Car : जगातील सर्वात महाग कार कोणती, जाणून घ्या

Romantic Places In Kalyan: पार्टनरसोबत डेटवर जायचा प्लान करताय? कल्याणमधील 4 रोमॅन्टिक ठिकाणे, आनंद होईल द्विगुणित

Satara News : डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती, मृत्यूचं खरं कारण समोर, शेवटचा कॉल कोणाला केला?

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT