Pune Rain Update Saam tv
मुंबई/पुणे

Pune Rain Update: पुण्यात पावसाची संततधार कायम राहणार; धरणातील पाणीसाठ्यात होतेय वाढ

Pune Dam Water Level: येत्या काही दिवसांत पुण्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune News: पुण्याात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाने शहर आणि धरण क्षेत्रातही कृपा केली आहे. या पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत पुण्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Latest Marathi News)

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहर व धरण क्षेत्रावरही कृपा केली आहे. या पावासामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पावसाला जोर नसला तरी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी पाणीसाठा वाढला आहे. आजही सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी पडत आहेत.

पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचत आहे. येत्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तिकडे सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे चांगला पाऊस होत आहे. २०, २४, २५ आणि २६ तारखेला आकाश ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होईल.

पुढील आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. त्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. पुढील आठवड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याने शुक्रवारी पुणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट दिला आहे.

तर पालघर , ठाणे, मुंबई, सातारा आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. या जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

पुण्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पुण्यातील वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात यंदा आजच्या तारखेला 41.93 टक्के,तर 12.22 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपकडून अरविंद केजरीवाल यांची बदनामी - संजय राऊत

7 Days Glowing Skin Challenge: ग्लोईंग स्किनसाठी फक्त 7 दिवस चेहऱ्यावर करा 5 सोपे उपाय

Viral flight video: विन्डो सीट बुक केली पण विमानातून सीटच गायब; तरूणीने सोशल मिडीयावर शेअर केला विचित्र अनुभव

Gold Price Today: होळीआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळ्यामागे ३१,६०० रुपयांची वाढ, २२-२४ कॅरेटचे आजचे दर किती?

Famous Actress : "हिरोच त्याच्या चित्रपटाची हिरोईन निवडतो..."; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलं बॉलिवूडमधलं सत्य

SCROLL FOR NEXT