Rain In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain : नाना पेठेतील वाड्याची भिंत कोसळली; दोन जण जखमी

शहरात पावसामुळे झाडपडीच्या १६ घटना दिवसभरात घडल्या.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह पुण्यात (Pune) मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दिवसभर पुणे शहरासह परिसरात जोरदार पाऊस (Rain) झाला. अशातच रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील एका वाड्याची भिंत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाले. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोचून भिंतीमध्ये अडकलेल्या जखमी व्यक्तीसह चार जणांना सुखरूप बाहेर काढले. (Pune Latest News)

शहरात रविवारी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस होता. तर रात्री आठ वाजल्यापासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, शहरात पावसामुळे झाडपडीच्या १६ घटना दिवसभरात घडल्या. त्यानंतर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ३८६, नाना पेठे येथील मॉडर्न बेकरी समोरील एका दुमजली वाड्याची भिंत कोसळली. त्यामुळे या वाड्यात राहणारे दोघेजण भिंतीमध्ये अडकले. याबाबत अग्निशामक दलास माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच जवान घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. (Pune Rain News)

लाकूड, पत्रे, दगड, माती व चिखल बाजूला काढून अग्निशामक दलाच्या जवानांनी कमलाकर झिंजूर्के (वय ६४), राजेंद्र झिंजूर्के (वय ६०), भारती झिंजूर्के (वय ५०) अशा तिघांना तेथून बाहेर काढले. त्यापैकी दोघानी गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य एकाची सुखरूप सुटका केली.

अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, जवान चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले , महेंद्र कुलाळ, विठ्ठल शिंदे, चंदकांत मेनसे, दिंगबर बांदिवडेकर, शिर्के व चालक अतुल मोहिते आणि कर्णे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

SCROLL FOR NEXT