Pawana Dam Water Storage Saamtv
मुंबई/पुणे

Pawana Dam News: पवना धरण १०० टक्के भरलं... ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

Pawana Dam Water Storage: पवना धरणातून ३५०० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Pawana Dam Overflow News:

मावळ तालुक्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढू लागली आहे. या पावसामुळे पवना धरणातून ३५०० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून पाटबंधारे विभागाने पवना नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मावळ (Maval) तालुक्यामध्ये कालपासून पावसाचा (Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच पवना धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवकही वाढू लागली आहे. पवना धरण 100 टक्के भरले असल्याने या धरणामधून आज सकाळी सहा वाजता वीज निर्मिती केंद्रासाठी 1400 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते.

मात्र पाण्याची आवक ध्यानात घेता यामध्ये वाढ करत धरणाच्या सांडव्या वरून 2100 क्युसेक्स पाणी असे एकूण 3500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घेत पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT