pune railway station news 
मुंबई/पुणे

Pune Crime : प्लॅट फॉर्म २ वर बॉम्ब, पुणे स्टेशन उडवणार, दारूच्या नशेत पुणे पोलिसांना फोन

pune railway station news : पुणे स्टेशनवरील प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला अन् पुणे पोलिसांत एकच खळबळ उडाली. त्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Latest Crime News : पुण्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा पोलिसांना फोन आला अन् एकच खळबळ उडाली. पुणे शहर पोलिसांना रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांची यंत्रणा तात्काळ कामाला लागली. फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दारूच्या नशेत त्यानं फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय.

पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. सकाळी 9 वाजता पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आल्याचा समोर आले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत त्याला ताब्यात घेतलेय. फोन करणार व्यक्ती वय 40 पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याची माहिती.

या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदरील व्यक्तीने दारूच्या नशेत खोडसाळपणे फोन केल्याचं तपासात उघड झालेय. आपल्याकडे लोकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कॉल केल्याचं पोलिसांच्या तपासात त्या व्यक्तीने सांगितले. पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सागर भंडारी असे आहे. रावेत येथील किवळे गावठाण येथे तो राहतो. रावेत पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिल्यानंतर सागर यानं पोलिसांना फोन करून धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT