Pune Pub Party Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Pub Party : निमंत्रण पत्रिकेसोबत कंडोम पाकिटं वाटली, पोलिसांनी पार्टीच रद्द केली, पुण्यातील 'त्या' पबवर कारवाई

Pune Condom And ORS Distribution Controversy: पुण्यातील मुंढवा भागातील नामांकित पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला येणाऱ्यांना कंडोमची पाकिटं वाटली. या वादानंतर पुणे पोलिसांकडून ही पार्टी अखेर रद्द करण्यात आली.

Priya More

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पुणेकर देखील नववर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. पुण्यामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्टींचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील एका पबने नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. या पार्टीची जोरदार चर्चा होत आहे. पण आता ही पार्टी रद्द करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा भागातील नामांकित पबमध्ये होणारी पार्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. पुणे पोलिसांकडून या पबला काल नोटीस देण्यात आली होती.

पुणे पोलिसांच्या नोटीसनंतर संबंधित पबने होणारी पार्टी अखेर रद्द केली आहे. पुण्यातील या पबमध्ये होणाऱ्या पार्टीची पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. तसेच या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले होते. सध्या पुणे पोलिसांडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या पबच्या पार्टीची सध्या सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू आहे. या पबकडून देण्यात आलेल्या कंडोम आणि ओआरएसच्या पाकिटांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पुण्यातल्या मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट पबमध्ये नव वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या अनुषंघाने कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला होता. पण या पबविरोधात अनेकांनी तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने देखील आक्रमक होत पबविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT