Pune Porsche Accident Latest Matathi News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Case : 'हवे तेवढे पैसे देतो, फक्त...', अपघात होताच आरोपी ओरडला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली सर्व घटना

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर त्या रात्री नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितली सर्व घटना

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्या शनिवारी (ता. १९) मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाने दारू पिऊन सुसाट कार चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागेवरच जीव गेला. दरम्यान, अपघातानंतर अल्पवयीन आरोपीने नेमकं काय केलं? त्यावेळी काय परिस्थिती होती? याबाबत प्रत्यक्षदर्शीने सर्व माहिती सांगितली.

ज्यावेळी हा अपघात झाला होता, त्यावेळी हमीन अकबर शेख हे पुण्यातील रिक्षाचालक कल्याणीनगर परिसरात थांबलेले होते. अपघाताबाबत हमीन शेख सांगतात, "शनिवारी रात्री उशिरा पुण्यातील बहुतांश रिक्षाचालक कल्याणीनगर भागात थांबलेले असतात. कारण, पब सुटल्यानंतर त्यांना चांगले भाडे मिळतात.

"अपघाताच्या दिवशी म्हणजेच शनिवारी मी देखील कल्याणीनगर परिसरात थांबलेलो होतो. उजवीकडे कुठलीही गाडी नव्हती. समोरुन गर्दी झाली होती. ते पाहण्यासाठी मी रस्त्याच्या पलीकडे गेलो. इतक्या अत्यंत वेगात पोर्श कार माझ्या मागून गेली".

"रस्ता क्रॉस करतानाच जोरात धडकेचा आवाज आला. माझ्या नजरेसमोरच मुलगी हवेत उडाली आणि धाडकन खाली आदळली. ती ऑन स्पॉट तिथल्या तिथे गेली. या घटनेनंतर आम्ही तिकडे धाव घेतली. काही लोक जमा झाले होते".

"अपघातानंतर लोकांनी आरडाओरड सुरू केली. काही मुले अलिशान पोर्शे कारमध्ये बसून होती. ती आतून जोरजोरात ओरडत होती. तुम्हाला आम्ही हवे तितके पैसे देतो, फक्त आम्हाला मारू नका, अशी ती मुले म्हणत होती. यात बिल्डरचा मुलगा देखील होता", असं प्रत्यक्षदर्शी हबीब शेख यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT