Pune Porsche Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठा ट्विस्ट; ससून रुग्णालयातील कर्मचारी पळाला, पोलिसांचा शोध सुरू

Sassoon Hospital Employee Runs Away: पोर्शे अपघातात प्रकरणी एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. चौकशीच्या भीतीनं ससून रुग्णालयातील कर्मचारी पळाल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

पुणे पोर्शे अपघातात प्रकरण रोज नवीन नवीन ट्विस्ट समोर येत आहे. आता ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळून गेल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. पोर्शे अपघातात प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टारांना निलंबित करण्यात आलंय, तर अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी देखील सुरू आहे.

आता ससून रुग्णालयातील हा कर्मचारी आपल्याला ताब्यात घेतील (Pune News) या भीतीपीटी पळाल्याची माहिती मिळतेय. ⁠या कर्मचाऱ्याने डॅाक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर यांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज या कर्मचाऱ्याला पोलीस अटक करण्याची शक्यता होती. त्यामुळे हा कर्मचारी पळून गेला आहे. पुणे पोलीस ( Pune Porsche Accident) या आरोग्य कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत. पोर्शे अपघातावरुन ससून हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

हा कर्मचारी ससून हॉस्पिटलच्या रक्त चाचणी विभागातील असल्याची माहिती मिळतेय. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रूग्णालयातील तिघांना ताब्यात आतापर्यंत घेण्यात आलं ( Porsche Accident Update) आहे. याप्रकरणी अजूनही काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलीय. रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला गेला आहे.

ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) पुणे पोर्शे अपघातातातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये टाकल्याचा आरोप दोन डॉक्टरवर करण्यात आला होता. यासाठी त्यांनी ३ लाख रूपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात आज रक्त चाचणी विभागामधील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. त्यानंतर अजूनही काही मोठे खुलासे होऊ शकतात, अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT